अमरावती दि. 31 :
स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमीच्या मिशन आयएएस तर्फे येत्या उन्हाळ्यात 10 मे ते 16 मे यादरम्यान अमरावती येथे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरासाठी 10 ते 20 हा वयोगट ठरविण्यात आला आहे. या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय व्यक्तिमत्व विकास मुलाखत तंत्र सराव परीक्षा याबाबत तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.
यामध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मिशन आय ए एसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन आयएएसच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.
हे वर्ष मिशन आयएएसचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आतापर्यंत मिशन आयएएसच्या अशा प्रकारच्या शिबिराला गेल्या पंचवीस वर्षात जवळपास 273 आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत. या शिबिराला महाराष्ट्रातील नामवंत आयएएस अधिकारी तज्ञ मार्गदर्शक तसेच यावर्षी आयएएस झालेले विद्यार्थी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरादरम्यान क्षेत्रभेट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या शिबिरात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी अमरावतीचे विभागीय आयुक्त अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावतीचे जिल्हाधिकारी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच मनपा आयुक्त या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्या ठिकाणच्या सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटणार आहेत व चर्चा करणार आहेत. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांनी आतापासून तयारी केल्यास त्यांना भावी जीवनासाठी यश सुकर व्हावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून मिशन आय ए एसचा हा उपक्रम सुरू असून या उपक्रमाचा लाभ आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. 2012 यावर्षी मिशनच्या या शिबिरामध्ये सुमारे 831 विद्यार्थी सहभागी झालेले होते. या शिबिरासाठी बाहेर जाऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांची अल्प दरात भोजन व निवास व्यवस्था संयोजकांनी केली असून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मिशनच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.
या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे व आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार यांनी या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी येण्याचे मान्य केले असून अन्य निमंत्रितामध्ये सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी श्रीमती निधी पांडे सचिव श्री संजय बेलसरे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार जिल्हाधिकारी श्री विपिन इटनकर श्रीमती संगीता महापात्र अपर जिल्हाधिकारी श्री स्वप्निल वानखडे महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव श्री जे पी डांगे नाशिकचे विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडाम संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यशदाचे महासंचालक श्री शेखर गायकवाड अमरावतीचे विभागीय पोलीस महानिरीक्षक श्री रामनाथ पोकळे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद मनपा आयुक्त श्री सचिन कलंत्रे पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सचिव श्री सुधाकर मुरादे जिल्हाधिकारी श्री रवींद्र ठाकरे माजी जिल्हाधिकारी श्री अरुण कुमार डोंगरे जिल्हाधिकारी श्री आस्तिककुमार पांडे आयपीएस अधिकारी श्री पंकज देशमुख आरटीओ अधिकारी श्री ज्ञानदेव मोडक यशदाचे संचालक श्री रंगनाथ नाईकडे आयएएस अधिकारी श्री विशाल नरवाडे आयपीएस अधिकारी श्री लोहित मतांनी श्री पंकज कुमावत खंडविकास अधिकारी श्री अभिषेक कासोदे पोलीस उपयुक्त श्रीमती श्वेता खेडकर माजी जिल्हाधिकारी श्री पुरुषोत्तम भापकर अप्पर आयुक्त श्री प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त श्री अमित काळे पोलीस उपायुक्त श्री नरेंद्र वानखडे उपविभागीय अधिकारी श्री संजय खडसे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून दरवर्षी चांगला प्रतिसाद प्राप्त होत असून या शिबिरात मार्गदर्शन घेऊन अनेक विद्यार्थी आज आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकारी झालेले आहेत. शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेचे धडे देणाऱ्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
प्रकाशनार्थ
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003