You are currently viewing भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या कु. आराध्या मुंडये हिला राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या कु. आराध्या मुंडये हिला राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर

वेंगुर्ले :

वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील तसेच सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची पाचवीतील विद्यार्थिनी आराध्या रूपेश मुंडये हिने हिंदी विकास संस्था नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड २०२४ परीक्षेत यश संपादन करून सुवर्णपदक व राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान पुरस्कारची मानकरी ठरली आहे. दिल्ली येथे ३० जानेवारी रोजी अंतरराष्ट्रीय हिंदी सन्मान समारंभ सोहळ्यात आराध्या हिला सन्मानित करण्यात येणार आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. हिंदी विकास संस्थेच्यातर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड परीक्षेचे आयोजन केले जाते विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाड परीक्षांचे महत्त्व फार आहे. या परीक्षा विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहेत कारण यामुळे त्यांचे ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता वाढते. हे विद्यार्थ्याच्या समस्या सोडविणे आणि तर्कशुद्ध कौशल्ये सुधारण्यासाठी मदत करते. अशा परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्याला सर्व शैक्षणिक विषयांचे समाधानकारक ज्ञान असणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा तसेच विद्यालयातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी बसविले जातात. या परीक्षेला यावर्षी २०२४ साठी सावंतवाडीतील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मधील आराध्या मुंड्ये (रा.भोगव , ता.वेंगुर्ले) बसली होती. या परीक्षेत तिने उज्वल यश संपादन केले. या यशामुळे ती सुवर्ण पदाची मानकरी ठरली आहे आणि राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान पुरस्कार हा बहुमानही तिने पटकावला आहे. आराध्या पाचवीत शिकत असून तिला या परीक्षेसाठी स्कूलच्या हिंदी विषय प्रमुख प्राची कुडतरकर व हिंदी विषयाच्या शिक्षिका महादेवी मालगर यांचे मार्गदर्शन लाभले. ३० जानेवारी रोजी पंतप्रधान संग्रहालय (नवी दिल्ली ) तीन मूर्ती भावनाच्या सभागृहात सन्मान सोहळ्यात आराध्या हिला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. हिंदी विकास संस्थेचे चेअरमन डॉ. पियुषकुमार शर्मा यांचे पत्र यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलला प्राप्त झाले असून आराध्या हिला या सन्मान सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यशाबद्दल आराध्या हिचे स्कूलचे संस्थापक अच्युत सावंत भोंसले, अध्यक्षा अडवोकेट श्रीमती अस्मिता सावंत भोसले, व्यवस्थापकिय समन्वयक श्रीमती सुनेत्रा फाटक, सचिव संजीव देसाई, मार्गदर्शक शिक्षिक, स्कूलच्या प्राचार्य प्रियांका देसाई तसेच स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. आराध्या ही अभ्यासात हुशार असून तिचे वडील रूपेश मुंड्ये व आई प्रियांका मुंड्ये यांचे तिच्या या यशात योगदान आहे. भोगवेचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच रूपेश मुंड्ये याची आराध्या मुलगी होय.

प्रतिक्रिया व्यक्त करा