You are currently viewing शिरोडा येथील तरुणाची ऑनलाईन फसवणूक : गुन्हा दाखल

शिरोडा येथील तरुणाची ऑनलाईन फसवणूक : गुन्हा दाखल

शिरोडा येथील तरुणाची ऑनलाईन फसवणूक : गुन्हा दाखल

२६ लाख २७ हजाराला गंडा

वेंगुर्ले

ऑनलाइन फसवणुकी बाबत सर्वत्र जनजागृती सुरू असताना हि फसवणुकीचे प्रकार मात्र सुरूच आहेत. यात शिरोडा येथील एक तरुण बळी पडला आहे. शिरोडा येथील एका तरुणाला टेलिग्राम वर ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहित करून तब्बल २६, २७, ७६६, रुपये ऑनलाईन पद्धतीने गंडा घातला आहे. याप्रकरणी त्या तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून वेंगुर्ले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरोडा या ठिकाणी या तरुणाला दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४ ते दि. २३ जानेवारी २०२५ दुपारी १ वाजण्याच्या कालावधीत टेलिग्राम अकाऊंटवर Dhanya Ravingram मो. नं. ९८६३१४७७२८ वरील अज्ञात आरोपीत याने The Goodguys या साईटवर टेंडर विक्री करण्याचा ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या टेलिग्राम वरील @FINANCIALCONSULTANTTGG वरील अकाउंट वरून विविध बँक अकाउंट देऊन त्यावर रक्कम २६, २७, ७६६, रुपये ऑनलाईन पद्धतीने भरणा करण्यास लावून फसवणूक केली. या संदर्भात त्या तरुणाने वेंगुर्ले पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीवर BNS 318 (4),IT act 66(c) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास वेंगुर्ले पोलिस निरीक्षक संदीप भोसले करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा