You are currently viewing सावंतवाडी स्थानकात रेल रोको यशस्वी..

सावंतवाडी स्थानकात रेल रोको यशस्वी..

*सावंतवाडी स्थानकात रेल रोको यशस्वी..*

मुंबई – मंगलोर एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात साखळी खेचल्याने तब्बल सहा मिनिटे थांबली.*

सावंतवाडी

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या रेल रोकोच्या पार्श्वभूमीवर अज्ञाताकडून सावंतवाडी स्थानकाजवळ गोव्याकडे जाणारी मंगलोर एक्स्प्रेसची साखळी ओढल्याने आज सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्स्प्रेस किमान ६ मिनिटे थांबली.
ही गाडीची साखळी ७.०१ मिनिटांनी अज्ञाताकडून सावंतवाडी स्थानकाजवळ ओढण्यात आली आणि ७.७ मिनिटांनी ट्रेन या ठिकाणाहून रवाना करण्यात आली.
या मंगलोर एक्स्प्रेसला सावंतवाडी स्थानकात थांबवण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना प्रयत्नशील असताना आणि रेल रोको च्या पार्श्वभूमीवर ही गाडी या ठिकाणी थांबवली जाणे हे कुठेतरी प्रवाशांचा मागणीला जोर येण्यासारखे आहे.
त्यामुळे संघटनेला अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा देणाऱ्या अज्ञाताचे सर्व स्थरावरून कौतुक करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा