You are currently viewing कुडाळात शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

कुडाळात शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

*रिक्षा रॅली काढत भंगसाळ नदीत नारळ केला अर्पण*

 

*खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक, संजय पडते यांची प्रमुख उपस्थिती*

 

कुडाळ :

 

कुडाळ येथे शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा रॅली काढून गुरुवारी नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना शाखा येथे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रिक्षा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. शहरातून भंगसाळ नदीपर्यंत रिक्षा रॅली काढत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते नारळ अर्पण केला.

 

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, अतुल बंगे, नगरसेवक उदय मांजरेकर, रिक्षा युनियन तालुकाप्रमुख किरण शिंदे, नगरसेविका श्रुती वर्दम, सई काळप, सचिन काळप, संजय भोगटे, सुशील चिंदरकर, राजू गवंडे, बाळा वेंगुर्लेकर, संदीप म्हाडेश्वर, बाळा कोरगावकर, गंगाराम सडवेलकर, दीपक आंगणे, विनोद शिरसाट, कृष्णा तेली, मंजू फडके, बाळा पावसकर, रोहित भोगटे, गुरु गडकर, पप्या राऊत आदींसह शिवसेना पदाधिकारी, रिक्षा युनियनचे पदाधिकारी, सदस्य, शिवसैनिक व कुडाळातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 7 =