You are currently viewing मराठी रंगभूमी दिनाचे औचित्यावर “आनंद सुधा बरसे…” ही नाट्यगीतांची मैफिल संपन्न

मराठी रंगभूमी दिनाचे औचित्यावर “आनंद सुधा बरसे…” ही नाट्यगीतांची मैफिल संपन्न

मराठी रंगभूमी दिनाचे औचित्यावर “आनंद सुधा बरसे…” ही नाट्यगीतांची मैफिल संपन्न

सावंतवाडी

श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व श्री सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून “आनंद सुधा बरसे…” ही नाट्यगीतांची मैफिल, विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी वसंत (भाऊ) साळगावकर, सैनिक पतसंस्थेचे सुनील राऊळ, दिनकर परब, कृष्णा राऊळ, प्रताप परब,विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटी चे बाबल डिचोलकर, सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक गुरुवर्य निलेश मेस्त्री, उत्कर्षा मेस्त्री, किशोर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या नाट्यसंगीत मैफिली मध्ये श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या नवोदित व यशस्वी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरूवात विभव विचारे,आरोही परब,आयुषी परब,श्रीया म्हालटकर,स्मिता गावडे,अंकुश आजगावकर, अथर्व नाईक यांनी संगीत “कट्यार काळजात घुसली” या नाटकातील ‘हे जगदीश सदाशिव…’ ह्या नांदीने केली त्यांनतर पूजा दळवी,मधुरा खानोलकर,चिन्मयी मेस्त्री,मानसी वझे,सिध्दी परब,वर्षा देवण- धामापूरकर, नितीन धामापूरकर,पुरुषोत्तम केळुसकर,मनीष पवार,भास्कर मेस्त्री, सर्वेश राऊळ,केतकी सावंत यांनी एकापेक्षा एक सरस नाट्यपदे सादर करत सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या मैफिलीला ऑर्गन साथ गुरुवर्य श्री.निलेश मेस्त्री हार्मोनियम साथ कु.मंगेश मेस्त्री व तबला साथ श्री किशोर सावंत यांची लाभली, आपल्या बहारदार शैली मध्ये निवेदन श्री.संजय कात्रे यांनी केले, ध्वनीव्यवस्था श्री.हेमंत मेस्त्री-पडेलकर यांनी सांभाळली.
या कार्यक्रमास विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी,पालकवर्ग व सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी उपस्थीती दर्शवली व कार्यक्रमाची सांगता श्री श्रीपाद चोडणकर यांनी ‘तमनिषेचा सरला’ ही भैरवी सादर करून केली.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 17 =