कुडाळ :
कुडाळ येथील सूनंदाई कृषी उद्योग या लाकडी तेलघाण्याला मराठी सिनेमा सृष्टीतील अभिनेते सुनिल तावडे, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, आरती वाडगबाळकर यांनी भेट दिली.
शुक्रवारी २४ जानेवारीला हे तीनही मराठी कलाकार कुडाळमध्ये आले होते. यावेळी त्यांनी कुडाळमध्येच असलेल्या प्रमोद चुडजी यांच्या सुनंदाई कृषी उद्योग या लाकडी तेलघाण्याला भेट देत या ठिकाणच्या अनेक वस्तू खरेदी केल्या. तसेच या तेलघाण्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी सूनंदाई कृषी उद्योगचे संचालक प्रमोद चुडजी उपस्थित होते.