You are currently viewing जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश ( CET ) परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. सन 2021 -22 या शैक्षणिक वर्षात आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जात वैधता पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत : 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते.वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये. यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेला नाही. त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी  समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी  ऑनलाईन अर्ज करावा  व त्याची प्रत समिती कार्यालयात सादर करावी.असेआवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − fifteen =