*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“प.पू तात्यासाहेब”*
वाणी अवतार श्री तात्यासाहेब केतकर
महाराजांचे दुजेरुप झाले गोंदवलेकरIIधृII
तात्या जन्मले रथसप्तमीलां साताऱ्यात
चिंतामण जानकी लाभले माता पिता छत्र
बालपणी जाहले राम-नाम कथा संस्कारII1II
भाऊसाहेब गेले गोंदवल्याला कामा निमित्त
चौकशी केली भाऊसाहेबांची श्रीं नी आदरांनं
श्रीं चे तेज भाषेचा प्रभाव पडला त्यांचेवरII2II
ब्रह्मानंदांकडून श्रीं ची ऐकिली ख्याती थोर
भाऊसाहेबांची निष्ठा जडली महाराजांवर
कायम वास्तव्य केले झाले गोंदवलेकरII3II
गोखलें कन्येचा विवाह ठरला तात्यां सुवर
श्रीरामा पुढे विवाह झाला रात्री अकरानंतर
श्रीं नी धरला लगाम वरात काढली बत्ताशावरII4II
भाऊ साहेबांनी प्रपंच सोपविला श्रीं चे हाती
तात्यांना अनुग्रहित केले श्री महाराजांनी
तात्या सौ यमुनाताईंना दिला कृपावरII5II
श्रीं चे मृत्यूनंतर बारा वर्षांनी घेतला अवतार
विनम्र निष्काम मृदु लाघवी बोलणं थोर
शिष्यांना खात्री पटली श्रीं चा झाला साक्षात्कारII6II
तात्यांनी जपले उपासना नाम स्मरण
सिद्ध संत पेटीवर बसून करती शंका समाधान
शरण जाऊ महाराजांना देती कृपावरII7II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.401201.Cell.9373811677.

