तिलारी घाटात टेम्पोचा अपघात
दोडामार्ग
कोल्हापुराहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ताडपत्री वाहतूक करणाऱ्या मिनी टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने तिलारी घाटात अपघात घडला. सुदैवाने यात अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र टेम्पोचे नुकसान झाले आहे. तिलारी घाटात धोकादायक वळण चढ-उतार तसेच धोकादायक वळणे यामुळे असे अपघात घडत आहेत.