You are currently viewing भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्काउट-गाईड कॅम्प’ उत्साहात….

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्काउट-गाईड कॅम्प’ उत्साहात….

_*भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्काउट-गाईड कॅम्प’ उत्साहात……*_

सावंतवाडी

_येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुलमध्ये दोन दिवसीय स्काऊट गाईड कॅम्प उत्साहात संपन्न झाला. यामध्ये पाचवी ते नववी इयत्तेतील स्काऊट्स आणि कब बुलबुल कॅडेट्स सहभागी झाले होते._

_प्रार्थना गीत आणि स्काऊट गाईड ध्वज फडकावून कॅम्पचे उदघाटन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या टाकाऊपासून टिकावू वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रथमोपचार आणि सीपीआर यावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. गंभीर परिस्थितीतील रुग्णांचे प्राण कसे वाचावावेत याची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली._

_सोबतच तंबू उभारणे, लाकडी संसाधनांचा वापर, कॅम्पस स्वच्छता, व्यायाम, आपत्कालीन उपाययोजना, स्वयंपाक बनवणे, शेकोटी नृत्य, गाणी, गोष्टी अशा विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. शिस्त, स्वावलंबन आणि जीवन कौशल्यांची बीजे विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा या कॅम्पचा मुख्य उद्देश होता._

_कॅम्प यशस्वी करण्यासाठी फ्लॉक लीडर श्वेता खानोलकर, एस्थर परेरा, प्रीती डोंगरे, वीणा राऊळ, रसिका कंग्राळकर तसेच कब मास्टर सचिन हरमलकर, संदीप पेडणेकर, गजानन पोपकर यांनी मेहनत घेतली._

प्रतिक्रिया व्यक्त करा