*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आजी औषधाचं खोड*
माझ्या भाबड्या आजीची
करू किती आठवण
माथी चंद्रकोरी कुंकू
फाटक्या चोळीची गुंफण
तिचा पदर नेटका
प्रसन्न मुद्रा वदन
हातभार त्या बांगडया
मंगळसुत्राची ठेवणं
मुखी हरीपाठ गाई
विठोबाची करी भक्ती
तिचा प्रेमळ स्वभाव
साऱ्या घराची ती शक्ती
सुनांवर करी माया
मुलांवर प्रेमाची छाया
पोट दुखता घडते
तिच्या बटव्याची किमया
जुन खोड औषधाचं
साऱ्या गावाची माऊली
जडी बुटीची ती खाणं
आरोग्य मय साऊली
**शीला पाटील. नाशिक*