You are currently viewing तौक्ते चक्रीवादळाच्या धोक्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या रेल्वे बंद

तौक्ते चक्रीवादळाच्या धोक्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या रेल्वे बंद

सिंधुदुर्ग

तौक्ते चक्रीवादळाच्या धोक्यामुळे दोन दिवसातील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत:-
दि. १६ व १७ रोजीच्या तिरुनेलेवली -जामनगर स्पेशल (०९५७७), वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४३), वास्को द गामाकुलेम पॅसेंजर (०७३४२), वास्को द गामा – यशवंतपूर वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४३), कुलेम – वास्को द गामा, वास्को द गामा-कुलेम पॅसेंजर (०७३४४), यशवंतपूर ग वास्को द गामा, वास्को द गामा-कुलेम पसेंजर (०७३३९) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत व कोकण रेल्वे मार्गे धावणारी दि. १७ रोजीची ओखा – एर्नाकुलम स्पेशल गाडी (०७३४२) गुजरातमधील ओखा तसेच अहमदाबाद स्थानकादरम्यान रद्द करण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा