You are currently viewing व्यापारी संघटनेच्या निर्णयानुसार ओरोस बाजारपेठ आठवडाभर बंद

व्यापारी संघटनेच्या निर्णयानुसार ओरोस बाजारपेठ आठवडाभर बंद

सिंधुदुर्ग :

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरी मधील ओरोस बाजारपेठ १७ ते २४ सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशन ओरोस-सिंधुदुर्गनगरी यांनी घेतला आहे. याबाबतचे पत्र व्यापारी संघाने सोमवारी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना दिले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गनगरी-ओरोस मध्ये सुद्धा रुग्ण संख्या वाढत आहे. ५० रुग्णा पेक्षा जास्त रुग्ण संख्या झाली आहे. त्यामुळे झपाट्याने होणारा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्याच्या नियोजनासाठी १३ सप्टेंबर रोजी व्यापारी संघाच्या कार्यकारिणी व निवडक व्यापारी यांची दुपारी ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर येथे बैठक झाली. या बैठकीत १७ ते २४ सप्टेंबर या कालावधीत ओरोस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मेडिकल व दवाखाने सुरु राहतील. तसेच दूध व वर्तमानपत्र घरपोच सेवा देण्यात येणार आहे, असे व्यापारी संघाने जाहिर केले आहे. ओरोस-सिंधुदुर्गनगरी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे व्यापारी संघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 1 =