You are currently viewing उद्या रंगणार कवठी येथे नारळ लढविणे स्पर्धा

उद्या रंगणार कवठी येथे नारळ लढविणे स्पर्धा

कुडाळ / प्रतिनिधी :

 

उद्या २० सप्टेंबर रोजी संजय करलकर मित्रमंडळ कवठी (ता. कुडाळ) आयोजित नारळ लढविणे स्पर्धा कवठी सातेरी मंदिर येथे संध्याकाळी ७ वाजता पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम परितोषिक २०२२ रु. द्वितीय परितोषिक १०११ रू. दिनेश कोळमकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी विशेष सहाय्य कवठी ग्रामस्थ आणि लाजरी ग्रुप कुडाळ यांचे आहे.

यावेळी आमदार वैभव नाईक, ओबीसी शिवसेना सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, राजू पाटणकर, महाडेश्वर यांची असेल. या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संजय करलकर मित्रमंडळ कवठी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा