सिंधुदुर्गनगरी येथे क्रीडा कार्यालयामार्फत जलतरण, बॅडमिंटन प्रशिक्षणाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी येथे क्रीडा कार्यालयामार्फत जलतरण, बॅडमिंटन प्रशिक्षणाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी :

खेळाडूंना आपल्यातील कलाकौशल्य दाखविण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. प्रशिक्षित विद्यार्थी खेळाडूंनी या प्रशिक्षणातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरावर चमकावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवणे यांनी केले .

सिंधुदुर्गनगरी येथे क्रीडा कार्यालयामार्फत जलतरण, बॅडमिंटन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुजवणे यांच्या हस्ते आज श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे व वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले या प्रशिक्षणासाठी सहभागी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधील क्रीडाविषयक सुप्त गुण विकसित व्हावेत. गुणवंत क्रीडापटू यांना क्रीडा मार्गदर्शन देण्यासाठी हे प्रशिक्षण असून जलतरण, बॅडमिंटन सारख्या खेळातून दर्जेदार खेळाडू घडवावे. या दृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.  १९ ते २८ जानेवारी अशा दहा दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणाचे जिल्हा क्रीडा विभागामार्फत आयोजन केले असून शासनाच्या क्रीडा विभागामार्फत अशा प्रशिक्षण कार्यक्रमा बरोबर विविध खेळांचे ही आयोजन केले जाते. त्याचा जास्तीत जास्त खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्तितित प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच मान्यवराचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा