You are currently viewing रेकोबा हायस्कूलच्या वेद प्रविण कुबलची बाल वैज्ञानिक परीक्षेच्या प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड.

रेकोबा हायस्कूलच्या वेद प्रविण कुबलची बाल वैज्ञानिक परीक्षेच्या प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड.

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या वायरी येथील डाॅ.शिरोडकर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री रेकोबा हायस्कूलचा ६ वी तील विद्यार्थी वेद प्रविण कुबलची बालवैज्ञानीक परीक्षेच्या प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड झाली आहे.

इयत्ता सहावीतील विद्यार्थी कुमार वेद प्रवीण कुबल याची मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या डॉक्टर होमी भाभा वैज्ञानिक परीक्षेत प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आणि ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येते.
लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन पुणे कोथरूड येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी त्याची निवड झाली आहे.

त्याची निवड झाल्याबद्दल डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई चे सचिव श्री स्वप्निक फाटक, स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोष गांवकर , वायरी भूतनाथ गांवचे सरपंच श्री भगवान लुडबे , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.शिंदोळकर यांनी विशेष कौतुक केले.त्याला शिक्षक कुबल यांचे नियमीत मार्गदर्शन लाभले आहे . त्याच्या यशाबद्दल संस्था पदाधिकारी ,स्कूल कमिटी पदाधिकारी, स्थानिक समिती पदाधिकारी, पालक शिक्षक संघ, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी वृंद ,विद्यार्थी यांनी प्रशंसा केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =