कालव्यातून वाहणाऱ्या पाण्यात परप्रांतीय कामगाराचा आढळला मृतदेह
दोडामार्ग
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाचा डाव्या कालव्यात थोरलेभरड येथे एका परप्रांतीय कामगाराचा मृतदेह आढळून आला.सदर मयत इसमाचे नाव इराप्पा उर्फ संजू नागाप्पा मुकालकट्टी (३८) रा. हिरेहोंनळी ता. धारवाड असे आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की,कर्नाटक राज्यातील आठ ते दहा कामगार खानयाळे येथील एका फार्महाऊसवर काम करीत असत. काल सकाळी यातील चार कामगार गोवा येथे गेले होते सायंकाळी सगळेजण माघारी परतले यातील दोघेजण काही काम आहे म्हणून उतरले तर दोघे कामगार खानयाळे येथे गेले होते ते परत उशिरापर्यंत न आल्याने सर्वजण त्यांचा शोध घेऊ लागले मात्र ते कुठेही आढळून आले नाही..मंगळवारी सकाळी तिलारी डाव्या कालव्यात थोरले भरड येथे कालव्याच्या गेटला अडकलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे
याबाबतची माहिती तात्काळ कालवा विभागाला देऊन कालव्यातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला पटवली.घटनास्थळी दोडामार्ग पोलीस ठाण्याची टीम पोहोचली. व मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू केली.कालव्यातील पाणी प्रवाह कमी झाल्यावर मृतदेह वर काढण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते महेश स्वार यांनी कालव्यात उतरून मृतदेह कालव्या बाहेर काढला.पोलिसांनी मुकादम श्रीसैल बसप्पा अंबोली यांच्याकडून जाबजबाब घेतला व रीतसर पंचनामा केला. बुधवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. अधिक तपास दोडामार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.घटनास्थळी श्री पालवे यांच्यासह पोलीस कर्मचारी रामचंद्र मळगावकर, पोलीस श्री.नाईक, श्री. देसाई, विजय जाधव,श्री.कांबळी तसेच आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.सोमवारी बेपत्ता झालेल्या दोन कामगारांपैकी एका कामगार मृतावस्थेत कालव्यात आढळून आला तर त्याच्यासोबत असणारा त्याचा सहकारी बेपत्ताच आहे.इराप्पा याचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिलारी डाव्या कालव्यात त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही.
मंजूनाथ अर्जुन होडगे. (३५) रा. हुबळी धारवाड हा बेपत्ता म्हणून दाखल करण्यात आले आहे. तर इराप्पा याची दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अधिकारी करीत आहे