You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण वैद्य यांचा पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण वैद्य यांचा पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

देवगड :

देवगड तालुक्यातील पाटगावातील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण अनंत वैद्य यांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षांमध्ये प्रवेश केला.मंत्री नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर प्रेरित होऊनआपण हा पक्ष प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

देवगड तालुक्यातील पाटगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण अनंत वैद्य यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रभावशाली नाव असलेल्या वैद्य यांनी पाटगाव येथील दत्त मंदिर ट्रस्टचे विश्वस्त म्हणून योगदान दिले आहे.

याप्रवेशा वेळी भाजपचे ग्रामीण तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, डॉ.मिलिंद कुलकर्णी आणि माजी सभापती रवी पाळेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पाटगाव परिसरात बाळकृष्ण वैद्य यांचा भाजपमध्ये प्रवेश हा पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला अधिक बळकटी देणारा निर्णय मानला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा