पाडलोसमध्ये 25, 26 रोजी गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धा*
सावंतवाडी
पाडलोस गाव व्हॉट्सॲप ग्रुप आयोजित गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 25 व 26 जानेवारी रोजी माडाचेगावळ येथे करण्यात आले आहे.स्पर्धा आठ संघात होणार असून विविध आकर्षक बक्षीस हे ठेवण्यात आली आहे.
पाडलोस प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वात सलग दोन दिवस होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांचा लाभ सर्व क्रिकेट प्रेमी,रसिकांनी घ्यावा असे आवाहन पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप चे अध्यक्ष पपी गावडे व सचिव प्रणित गावडे यांनी केले आहे.