कारभारी लयभारी ! म्हणून पत्नीनं पतीला थेट खांद्यावर उचलून घेतलं

कारभारी लयभारी ! म्हणून पत्नीनं पतीला थेट खांद्यावर उचलून घेतलं

वृत्तसंस्था:

राज्यात काल ग्रामंपंचायत निवडणुकीता निकाल लागला. यामधील काही ग्रामपंचांयतींचे निकाल हे अनपेक्षित असे होते. विजयी झालेल्या उमेदवाराच्या मिरवणुक काढतात मात्र कोरोनामुळे यंदाच्या वर्षी मिरवणुकीला बंदी आहे. मात्र आपल्या कारभाऱ्याला एका पत्नीन थेट खांद्यावर उचलून घेत विजयी मिरवणुक काढली आहे.

पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार संतोष शंकर गुरव यांची पत्नीन रेणूका गुरव यांनी त्यांना खांद्यावर घेऊन गावातून फेरी मारली. या उत्साही पती-पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने सात पैकी 6 जागांवर विजय मिळवला.

या विजयामागे महिलांचा मोठा वाटा होता.

दरम्यान, संतोष गुरव यांनी 221 मते मिळवत विरोधी मतदाराला पराभवाची धूळ चारली.

प्रतिक्रिया व्यक्त करा