*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलाबस्तवन….!!*
अलक्तरंगात विलोल लोचनी
अनलंकृत रूप तुझे
दुकुल नेसलेस चांदण्यांचे
ईश्वरीरूप उगवले तुझे …
कुंकूमतिलक कपाळी लावून
लवंगीकेसराने सुगंधीत झालास
अमृत तुषारांच्या सिंचनाने
आत्मशुध्दीस गायत्रीमंत्र जपलास..
मधुर कुसुमगंधाच्या नुपूरांनी
ह्दयांना पुष्पसंभारानं लुटलंस
धरेला बिलगून कायेत
गर्भार भुईत रूजलास..
सुखसाजणा!हुंकार देऊन
प्रेमपल्लव रसरंगात लपलास
विलीन होऊन ह्दयात
ब्रम्हतेज पसरून गेलास..
बाबा ठाकूर धन्यवाद
भारतीय सहा भाषेत अनुवादित
ठाकूरी उवाच..चौदावे..!