You are currently viewing बेकायदा वाळू वाहतूक, बांदा येथे पाच गाड्या ताब्यात…

बेकायदा वाळू वाहतूक, बांदा येथे पाच गाड्या ताब्यात…

बेकायदा वाळू वाहतूक, बांदा येथे पाच गाड्या ताब्यात…

सावंतवाडी महसूलची कारवाई; कारवाईत सातत्य राहणार, तहसीलदारांचा इशारा…

सावंतवाडी

बेकायदा वाळू वाहतूक केल्या प्रकरणी तेथील महसूल प्रशासनाकडून तब्बल पाच गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ही कारवाई आज बांदा येथे करण्यात आली. या गाड्या सिंधुदुर्गातून गोव्याच्या दिशेने जात होत्या. पुढील कारवाईसाठी गाड्या सावंतवाडी तहसिलदार कार्यालयात जमा करण्यात आला आहेत. त्या कारवाईमुळे अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाळू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अशीच कारवाई पुढे सुरू राहणार, असा इशारा तहसीलदार सुधर पाटील यांनी दिला आहे. ही कारवाई आंबोली मंडळ अधिकारी संजय यादव, ग्राम महसूल अधिकारी सचिन चितारे, प्रवीण पोले, केतन कांबळे, महेश लटपटे आदींच्या पथकाकडून करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा