You are currently viewing कणकवलीत उद्या १८ जानेवारीपासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन लीग

कणकवलीत उद्या १८ जानेवारीपासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन लीग

कणकवलीत उद्या १८ जानेवारीपासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन लीग

कणकवली

कणकवली बॅडमिंटन क्लब आणि केएनके स्मशर्समार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शनिवार १८ जानेवारी आणि रविवार १९ जानेवारी रोजी प. पू. भालचंद्र महाराज आश्रमानाजिकच्या न्यू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग २०२५ या भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते १८ रोजी सकाळी १० वाजता कणकवली मधील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितित होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यास समीर नलावडे यांच्याकडून २५००० रुपये आणि उपविजेत्या संघास 6 AM बॅडमिंटन क्लब कणकवली यांच्याकडून १५००० रुपये तसेच अनेक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी सर्व क्रीडा रसिकांनी या स्पर्धेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन कणकवली बॅडमिंटन क्लब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा