You are currently viewing कवितेच्या माध्यमातून व्यवस्थेची चिरफाड करणारे कवी पद्मश्री नामदेव ढसाळ… अॅड. नकुल पार्सेकर.

कवितेच्या माध्यमातून व्यवस्थेची चिरफाड करणारे कवी पद्मश्री नामदेव ढसाळ… अॅड. नकुल पार्सेकर.

कवितेच्या माध्यमातून व्यवस्थेची चिरफाड करणारे कवी पद्मश्री नामदेव ढसाळ… अॅड. नकुल पार्सेकर.

१५ जानेवारी एका प्रतिभावंत कवींचा स्मृतीदिन. गेली अकरा वर्षे भारतच्या संसदेत आणि सार्वजनिक ठिकाणी मा. मोदि- शहांच्या कृपेने आम्हां भारतीयांची करमणूक करणारे यमक कवी आणि आपल्या अस्सल प्रतिभेच्या जोरावर प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला जाग आणणारे आणि प्रश्न विचारणारे, दलित साहित्यामध्ये परिवर्तनवादी विचार मांडणारे स्व. पद्मश्री नामदेव ढसाळ यांची काकणभर पण तुलना होऊ शकत नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईवर भौतिक सुखं भोगणाऱ्यानां ढसाळ आणि त्यांचे साहित्य समजणे फारचं कठीण.
डॉ. ढसाळ यांनी सामाजिक समरसता काय असते याची प्रचिती आपल्या अनेक कविता मधून दिली. शब्दच्छल करून अस्पृश्यता दुर होत नाही. काही काळ दलित चळवळीतील कार्यकर्ते फसतील पण जेव्हा वास्तव् त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते निश्चितच ढसाळांचे स्मरण करतील.
क्षणिक भौतिक सुखासाठी व सत्तेसाठी डॉ. बाबासाहेबांच्या विचारानां तिलांजली देऊन अनेक दलित नेत्यांनी दलित जनतेशी प्रतारणा करून दलित चळवळीचे तीनतेरा वाजवले. अशावेळी आपल्याला नामदेव ढसाळां मधला बंडखोर कवी आठवतो.
गोलपीठा काराने भारतरत्न बाबासाहेबांना उद्देशून एक कविता लिहिली…
ते लिहितात,
बाबासाहेब,
जे आज आमचे जे काही आहे,
हे जगणे आणि मरणे,
हे शब्द आणि जीभ,
हे सुख आणि हे दु:ख,
हे स्वप्न आणि हे वास्तव,
ही भूख आणि ही तहान,
ही सर्व पुण्याई तुमचीच आहे.
गेल्या वर्षभरात संविधानाच्या बाबतीत प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार भूमिका घेत आहेत मात्र मा. नामदेव ढसाळांनी दलितांना जे मिळाले ते फक्त आणि फक्त बाबासाहेबामुळेचं. ढसाळ हेच खरे बाबासाहेबांचे अनुयायी होते. साहित्यातील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. दलित पँथरचे ते संस्थापक होते. या पॅंथरने दलित साहित्यात एक वेगळाचं इतिहास निर्माण केला होता.. दलित साहित्यात आणि चळवळीत असा झुंझार पॅंथर पुन्हा होणे नाही… ञिवार वंदन!

प्रतिक्रिया व्यक्त करा