You are currently viewing खा. नारायण राणें यांच्याकडून सी.ए तन्वी कदमचे अभिनंदन

खा. नारायण राणें यांच्याकडून सी.ए तन्वी कदमचे अभिनंदन

कुडाळ :

कसाल गावातील उद्योजक संतोष कदम यांची सुकन्या तन्वी कदम हिने ‘चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.) या परीक्षेत यश मिळविले आहे. पहिल्याच प्रयत्नात ती चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली असून तिने मुंबई – जुहू येथील अधिश निवासस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी खा. नारायण राणे आणि सौ. नीलम राणे यांनी तन्वी हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पुढील प्रगती अशीच होत राहो असे आशीर्वाद देखील दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा