श्री महेश विठ्ठल सावंत (कुडाळ – आंदुर्ले ) प्रस्तुत भजनारंग आणि तबला पखवाज वादनाचा कार्यक्रम श्री क्षेत्र पंढरपूर अक्कलकोट येथे संपन्न
कुडाळ
*श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, सिंधुदुर्ग, पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत (कुडाळ – आंदुर्ले ) प्रस्तुत भजनारंग आणि तबला पखवाज वादनाचा भक्तीपूर्ण संगीत कार्यक्रम श्री क्षेत्र पंढरपूर आणि अक्कलकोट वटवृक्ष श्री स्वामीं समर्थांचरणी तसेच मंगळवेढा नंदेश्वर श्री बाळकृष्ण महाराज मठ येथे संपन्न झाला*
पखवाज अलंकार श्री महेश सावंत आणि 75 पखवाज वादक विद्यार्थी व पालक वर्ग यांच्या वतीने डॉ.श्री दादा परब व भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळूसकर संचलित आणि पखवाज प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पखवाज विशारद श्री दत्तप्रसाद खडपकर, श्री सचिन कातवणकर,युवा तबला वादक कु.सूरज पालव (हुमरमळा), पखवाज वादक श्री संदेश पारधी (रत्नागिरी), श्री कैलास मिरकर (चिपळूण),तसेच गायक /हार्मोनियम श्री अमित उमळकर (कुडाळ), महिला डबलबारी च्या गायिका सौ.साची मुळम (देवगड),गायक श्री उमेश मेस्ता (कर्नाटक),श्री स्वप्नील हडकर(मालवण),गायिका सौ. विद्या कवठणकर (बिबवणे) गायक ,श्री महेश होळंब (गुहागर) आणि समस्त श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचा भजनारंग आणि तबला व 75 पखवाज वादन संगीत सेवेचा भक्तीमय कार्यक्रम शनिवार 11 व रविवार 12 जानेवारी 2025 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर पांडुरंग चरणी तसेच अक्कलकोट श्री स्वामीं समर्थांच्या चरणी वटवृक्ष येथे भक्तीमय सादर झाला तसेच मंगळवेढा नंदेश्वर येथे बाळकृष्ण महाराज मठात सुद्धा भजनारंग ध्रुपद सादर करून सर्व भाविक भक्तांना सिंधुदुर्ग मधील कलाकारांनी संगीतामध्ये भक्तीरसात दंग केले, याबद्दल महेश सावंत बोलताना म्हणाले कीं आपल्या विद्यालयात पखवाज/मृदंग प्रशिक्षण सोबत असे अनेक संगीत दौरे करून विद्यार्थ्यांना आजच्या पिढीत मुलांना अधिक अध्यात्मकडे कसे नेता येईल व यातून त्यांची प्रगतीकडे उन्नती आणि विकासाकडे वाटचाल कशी होईल यासाठी गुरूंच्या आशीर्वादाने असे धार्मिक काम सदैव कायम चालू ठेऊ असे सांगितले याबद्दल विद्यालयाचे संचालक डॉ.श्री दादा परब आणि बुवा भालचंद्र केळूसकर यांनीही सर्वांचे खूप कौतुक केले आहे तसेच समस्त सिंधुदुर्ग वासियांकडून कौतुक होत आहे
______________________________
*संवाद मीडिया*
👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼👩💼
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी.*
*_एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्न_*
*BCA प्रवेश प्रक्रिया 2025- 2026*
*🔴बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2025-26*
*_ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी.⭕_*
*📌 कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.*
*📔CET साठी महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन वर्ग घेतले जातील.*
*📌 बीसीए प्रवेश व सीईटीच्या मार्गदर्शनाकरिता खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.*
https://chat.whatsapp.com/GproyGGMKOa8U0fh2goTkW
*अधिक माहितीसाठी :*
*7972997567 /9420274119*
*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा.*
*जाहिरात
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*