अर्जुन रावराणे विद्यालय फ्लाईंग बर्डस् शिशु वर्गाचे उद्घाटन

अर्जुन रावराणे विद्यालय फ्लाईंग बर्डस् शिशु वर्गाचे उद्घाटन

वैभववाडी

अर्जुन रावराणे विद्यालय फ्लाईंग बर्डस् शिशु वर्गाचे उद्घाटन प्राथमिक शिक्षक पतपेढी माजी चेअरमन सुनील चव्हाण  यांच्या या हस्ते करण्यात आले.  त्यांनी आपल्या मनोगतात मी या शाळेचा माझी विद्यार्थी असून या शाळेचा वटवृक्ष अर्जुन रावराणे विद्यालयाचे स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली रुपांतरीत होत आहे याचा आज मला अभिमान वाटत आहे. कारण याठिकाणी प्लेग्रुप ते बारावी पर्यंत चे शिक्षण एकाच छताखाली या ठिकाणी मिळणार आहे.  त्यामुळे वैभववाडी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे या संस्थेला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी संस्थेचे अधीक्षक जयेंद्र रावराणे माजी वित्त व बांधकाम सभापती सिंधुदुर्ग, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, नगरसेवक संजय सावंत, मुख्याध्यापक बी एस् नादकर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा