You are currently viewing पहिली भेट

पहिली भेट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पहिली भेट* 

 

पहिली भेट आपली

अजुनही आहे स्मरणात

वाऱ्यासवे दौडत आलास

होतास तु पावसात

 

मावळल्या तिन्ही सांजा

सख्या बैसले एकटी

का रे दुरावा मजशी

नयनी आसवांची दाटी

 

क्षितिजाच्या लाल बाहु

त्याही आता अंधारल्या

दुरवरच्या या वाटाही

तिमिरात विखुरल्या

 

मंद वाऱ्याची झुळुक

अंगावरी येतो शहारा

नकळत भय वाटते

भेटीस ये लवकरा

 

प्रतिबिंब ते पाण्यातले

हळुच लोप पावले

वाट पाहुनिया सख्याची

डोळे माझे हे थकले

 

का रे हा अबोला ?

का रे रागावला

शपथ तुला प्रितीची

साथ आज दे मला

 

*शीला पाटील. नाशिक*

प्रतिक्रिया व्यक्त करा