You are currently viewing बॉलिवूडची प्रतिमा पुन्हा एकदा खराब झाली -लेखक जावेद अख्तर

बॉलिवूडची प्रतिमा पुन्हा एकदा खराब झाली -लेखक जावेद अख्तर

मुंबई :

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपाटिजमवर मोठा वाद सुरू आहे. आतले आणि बाहेरचे असा वाद सुरू झाल्याने बॉलिवूडमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. या झगमगत्या जगाची सत्य परिस्थिती काय आहे? लोकांनी कशावर विश्वास ठेवावा, ही बाब लक्षातच येत नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर केवळ नेपोटिज्मच नाही तर ड्रग्जमुळे बॉलिवूड घराघरात चर्चेचा विषय बनला आहे. या दिवसात गदारोळ होत असलेल्या या विषयावर प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणतात की,नेपोटिजम आणि ड्रग्ज सुशांत प्रकरणात ज्याप्रकारे ड्रग्जचं कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे बॉलिवूडची प्रतिमा पुन्हा एकदा खराब झाली आहे. विविध मुद्द्यांवर आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करणारे जावेद अख्तर यांनी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनला एक मोठी समस्या असल्याचे सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, मी याबाबत केवळ ऐकलं आहे. मी माझ्या डोळ्यांनी केव्हाच ड्रग्ज पाहिलं नाही. मात्र तरुण याचा वापर करतात हे मी ऐकलं आहे. ही केवळ चित्रपटसृष्टीच नाही तर संपूर्ण समाजाची समस्या आहे. ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते म्हणाले की मला तर हे देखील माहिती नाही की काय वैध्य व काय अवैध्य आहे. या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी व ही समस्या मूळापासून संपविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

दरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर नेपोटिजमबरोबर आता बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनबाबत मोठी चर्चा सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 11 =