You are currently viewing रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा १२ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात पार..

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा १२ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात पार..

कणकवली :

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल चा बारावा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात पार पडला. काल नेहमीप्रमाणे रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल चे सर्व रोटेरियन सकाळी पाच वाजल्यापासून क्लब चा वर्धापन दिन उत्साहात साजरा करताना दिसले.

सकाळी सहा वाजता भव्य सायकल रॅलीचे आयोजन केलं त्यानंतर जयपूर फूट प्रदान करण्याचा कार्यक्रम केला आणि सायंकाळी  चार्टर नाईट सेलिब्रेशन केलं गेलं विशेष कौतुक म्हणजे प्रेसिडेंट लवू पिळणकर यांच्या प्रास्ताविक ने सुरुवात झाली. MOC म्हणून मेघा गांगण आणि दिशा अंधारी यांनी अप्रतिम धुरा सांभाळली. डॉक्टर विद्याधर तायशेटे सर्वांना जातीनिशी अटेंड करत होते दीपक अंधारी, डॉक्टर पावसकर, करपे, मुसळे, नितीन बांदेकर, धनंजय कसवनकर सर्व अत्यंत उत्साहात होते.

संतोष आणि त्यांच्या सुविद्य पत्नी छायाचित्रण करत होत्या. वर्षा बांदेकर यांनी तिळगुळची केलेले चॉकलेट्स लक्षवेधी होती. माझे मित्र दादा यांनी तर नेहमी प्रमाणे चौफेर फटकेबाजी केली दीपक अंधारी यांनी रोटरी फॅमिली एक्सचेंज अंतर्गत त्यांच्या राजस्थान दौरा बद्दल माहिती दिली गव्हर्नर चे  प्रतिनिधी म्हणून गजानन कांदळगावकर उपस्थित होते.

रोटरी बद्दल सर्वांना अत्यंत महत्वाची माहिती गजानन यांनी शेअर केली. क्लब मधील सगळ्यांचं त्यांनी कौतुक केलं. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व चार्ट प्रेसिडेंट काल चार्टर नाईटला उपस्थित होते. वेंगुर्ला कुडाळ देवगड क्लबचे मेंबर उपस्थित होते थोडक्यात कोणत्याही कार्यक्रमाचे उत्सवामध्ये परिवर्तन करण्याचे कणकवलीच्या मेम्बर्स ची हातोटी यामुळे कालचा वर्धापन दिन संस्मरणीय ठरला.

रोटरी रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 मधील सर्व कार्यक्रमांमध्ये कणकवली क्लबचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. कॉन्फरन्स साठी आतापर्यंत सर्वाधिक पंधरा रजिस्टेशन कणकवली क्लब ने केली आहेत. त्याबद्दलही कणकवली क्लब चे अभिनंदन आणि काल वर्धापन दिनानिमित्त चार्टर प्रेसिडेंट दीपक बेलवलकर यांच्या अंगणात पंचपक्वान देखील आम्ही एन्जॉय केलं पुन्हा एकदा एक तप पूर्ण केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल चे  हार्दिक अभिनंदन.👏👏👏

रो. प्रणय तेली

असिस्टंट गव्हर्नर

RID 3170.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =