You are currently viewing कुडाळ मालवण मतदार संघातील सर्वच शासकीय विभागांमार्फत झालेल्या विकास कामांची आमदार निलेश राणे यांनी झाडाझडती घेण्याची गरज.

कुडाळ मालवण मतदार संघातील सर्वच शासकीय विभागांमार्फत झालेल्या विकास कामांची आमदार निलेश राणे यांनी झाडाझडती घेण्याची गरज.

*कुडाळ मालवण मतदार संघातील सर्वच शासकीय विभागांमार्फत झालेल्या विकास कामांची आमदार निलेश राणे यांनी झाडाझडती घेण्याची गरज.*

*मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी.*

निदान गेल्या दोन वर्षात कुडाळ मालवण मतदार संघातील सर्वच बांधकाम विभाग उदा. सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, मुख्यमंत्री प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना तसेच सर्व ग्रामपंचायती मार्फत अनेक विकास कामे ही निकृष्ट दर्जाची झालेली आहेत.अशा निकृष्ट दर्जाहीन कामांमुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रासही सोसावा लागत आहे.आणि म्हणूनच याबाबत त्या त्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधी पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या तक्रारी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. कुडाळ मालवणचे आमदार म्हणून आपण मालवण मध्ये केलेला स्पॉट पंचनामा त्यानंतर कुडाळ पंचायत समितीच आढावा बैठक हे स्वागतार्ह आहे. परंतु दहा वर्षाच राहू द्या गेल्या पाच वर्षात ज्या ज्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडा पण त्यांना राजकीय आश्रय असल्यामुळे पुन्हा पुन्हा कामे द्यावी लागतात असे खाजगीत त्या त्या विभागाचे विभागाचे अधिकारीच सांगत आहेत.
याचमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत आपल्याकडे मागणी करत आहोत की गेल्या पाच वर्षातील विकास कामांचा आढावा घेत असताना जरी ते आपल्या जवळचे असले तरी आपण कुडाळ मालवणच्या जनतेशी प्रामाणिक राहून कडक कारवाई करावी. तसेच यासंदर्भात व अन्य विकासात्मक बाबींसाठी मनसे भविष्यात नेहमी आपल्या मार्फत पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील असेल असे मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा