You are currently viewing भाजपाच्या वतीने ११ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत ” संविधान गौरव अभियान ” चे आयोजन

भाजपाच्या वतीने ११ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत ” संविधान गौरव अभियान ” चे आयोजन

भाजपाच्या वतीने ११ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत ” संविधान गौरव अभियान ” चे आयोजन*

*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा संयोजक – संविधान गौरव अभियान , सिंधुदुर्ग* .

*संविधान गौरव अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीपणे राबवीण्यासाठी अनुसूचित जाती मोर्चाची जिल्हा बैठक संपन्न*

वेंगुर्ले

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ची जिल्हास्तरीय बैठक वसंत स्मृती – सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा उपाध्यक्ष तथा संविधान गौरव अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी प्रमुख मान्यवर जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव , अभियान सहसंयोजक अदिती सावंत , बाबली वायंगणकर , चंद्रकांत वालावलकर , वासुदेव जाधव उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि , मोदी सरकारने देशाला विकासाच्या मार्गावरुन पुढे नेताना संविधानाचे पावित्र्य राखण्याचे काम केले आहे . मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार हे निःपक्षपाती सरकार आहे, सर्वांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक न्यायावर नव्याने लक्ष केंद्रित करणारी धोरणे आखली जात आहेत . संसदेच्या सेंट्रल हाॅलसमोर श्रद्धांजली अर्पण करणे असो कि संविधाना समोर नतमस्तक होणे, संविधान दिन साजरा करणे असो कि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचे प्रतिनिधित्व सक्षम करणे असो , सामाजिक न्याय हा मोदी सरकारने कृतीतून दाखवून दिला .
संविधान सभेच्या मसुदा समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना स्वीकारली .मात्र २६ जानेवारी १९५० पासुन राज्यघटना पुर्णपणे अंमलात आली. दरवर्षी याच दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो.
२०१५ च्या आधी ‘ २६ नोव्हेंबर ‘ हा कायदा दिवस म्हणुन ओळखला जात होता . मोदी सरकारच्या पहील्या कार्यकाळात हा दिवस ” संविधान दिन ” म्हणून साजरा केला जाऊ लागला . योगायोगाने हा निर्णय आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षांत घेण्यात आला . राष्ट्र – राज्य म्हणून आपल्या मुलाधारांचा सारांश ‘ संवैधानिक लोकशाही ‘ या अवघ्या दोन शब्दात सामावलेली आहे . आपली राज्यघटना आणि घटनेचे राखणदार आणि परिचालक म्हणून काम करणारे सर्वोच्च न्यायालय यांनी गेल्या अनेक वर्षात जगासमोर एक शक्तिशाली उदाहरण ठेवले आहे. संविधान दिन हा सर्व नागरिकांना विनम्रपणे आठवण करुन देतो की त्यांनी केवळ संविधान वाचलेच नाही तर ते आचरणात आणले पाहीजे . या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे कौतुक केले पाहिजे.

प्रतिक्रिया व्यक्त करा