*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अर्धवट कविता*
कित्येक पाने रंगवली
अर्धवट राहिल्या कवितांनी
विचार श्रृंखला खंडीत केली
अभद्र त्या विचारांनी
एक एक शब्द वेचून
जोडीत होतो ओळी
मधेच येता व्यत्यय
खंडीत होई प्रवाहाची खेळी
धुळ खात पडून आहेत
पाने अडगळीत कपाटात
कधीतरी लक्ष द्यावे
कवीला रोज खुणावतात
अजून त्यांच्यात प्राण ओतून
न्यावे त्यांना पूर्णत्वास
पुनश्च विचारांची साथ मिळेल
करूनी नव्याने अभ्यास
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
8308667477.
7588318543.