You are currently viewing विवेकानंद विचार प्रेरणा या विद्यार्थी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन, शारदा विद्यामंदिर शाळेत

विवेकानंद विचार प्रेरणा या विद्यार्थी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन, शारदा विद्यामंदिर शाळेत

(शनि. दि ११ जानेवारी २०२५ रोजी सायं. ४ वा.)

ठाणे :

स्वामी विवेकानंद जयंतीच्या पूर्वसंध्येला चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि शारदा विद्या मंदिर ठाणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी, सायंकाळी ४ वाजता. आम्ही स्वामी विवेकानंद विचार प्रेरणा ही विद्यार्थी अभिवाचन स्पर्धा घेत आहोत. यामध्ये ठाणे शहरातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. या विद्यार्थी अभिवाचन स्पर्धेत स्वामी विवेकानंद यांच्या लेखन साहित्यावर आधारित कथा, लेख व काही निवडक परिच्छेदाचे अभिवाचन करायचे आहे. त्याकरता सर्व विद्यार्थ्यांना ५ मिनिटांचा अवधी दिला गेला आहे. ही स्पर्धा संपन्न झाल्यावर लगेच बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

ह्या कार्यक्रमाला शारदा विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनिषा जाधव, कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजक डॉ सौ. प्रतिक्षा बोर्डे, कार्यक्रमाचे आयोजक शारदा विद्या मंदिर शाळेचे समन्वयक, पत्रकार राजेंद्र गोसावी तसेच चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड रुपेश पवार आणि प्रमुख पाहुण्या बाल कल्याण समिती पुणे, अध्यक्षा व गोल्डन लेटर्स बाल विकास फाऊडेशन महाराष्ट्र अध्यक्षा तथा विश्वस्त बालमानसतज्ञ डॉ राणी दुष्यंत खेडीकर हे सर्व मान्यवर त्याचप्रमाणे वरील दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मदतीसाठी आवाहन

या स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व ठाणेकरांना. आव्हान करत आहोत की शारदा विद्यामंदिर ठाणे ही शाळा गरीब व अनाथ मुलांची निवासी शाळा आहे. त्यामुळे ही शाळा देणगी तत्वावर चालते या संस्थेचे शिक्षक मुलांच्या भवितव्यासाठी स्वतःहून आर्थिक हातभार लावत आले आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील इच्छुक दानशूर व्यक्तींनी शारदा विद्या मंदिर या निवासी शाळेला आर्थिक मदत करून ह्या समाज कार्याला हातभार लावावा. असे आवाहन शारदा विद्या मंदिर संस्थेचे समन्वयक राजेंद्र गोसावी यांनी केले आहे. संपर्क नंबर +919920724627 या कार्यक्रमाची संकल्पना चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड रुपेश पवार यांची असून, या कार्यक्रमाला संपूर्ण सहाय्य डॉ. प्रतीक्षा बोर्डे आणि डॉ. राणी खेडीकर यांनी केलेले आहे, तरी आपण शारदा विद्या मंदिर शाळेला सहाय्य करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा