You are currently viewing क्षितिजावरची शब्दपर्णवी साहित्य मंच औरंगाबाद महाराष्ट्र पहिलं राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न*

क्षितिजावरची शब्दपर्णवी साहित्य मंच औरंगाबाद महाराष्ट्र पहिलं राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न*

*क्षितिजावरची शब्दपर्णवी साहित्य मंच औरंगाबाद महाराष्ट्र पहिलं राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न*

*औरंगाबाद*

सुख आणि दुःख आठवून बेधुंद होण्याची नशा म्हणजे कविता तर सुखदुःखाच्या उंबरठयावरची वाट म्हणजे कविता, असे भावस्पर्शी प्रतिपादन चित्रपट गीतकार गुलाब राजा फुलमाळी यांनी कवितेवर भाष्य करतांना केले
औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनात दुसऱ्या सत्रातील काव्य संमेलनाध्यक्ष या पदावरून ते बोलत होते
क्षितिजावरची शब्दपर्णवी साहित्य मंच महाराष्ट्रच्या वतीने समुहाचा वर्धापनदिन व भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व मराठी भाषेचा वारसा पुढे चालावा तिचे संवर्धन व्हावे या तिहेरी संगमातून राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यात पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा ही आयोजित करण्यात आला

बजाजनगर औरंगाबाद येथील मसिहा हाॅल मोरे चौक येथे 19 जून रोजी हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रथम सत्राचे सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका व कवयित्री निशा कापडे यांनी असून व्दितीय सत्राचे सुत्रसंचालन कवयित्री वैशाली कंकाळ व शंकर कदम यांनी केले.
या कार्यक्रमाला उद्घघाटक म्हणून समाजसेविका कवयित्री संगिता भाऊसाहेब जामगे, व अध्यक्षस्थानी विठ्ठल घाडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर दैनिक एकमत चे संपादक संजयजी येऊलकर, ज्येष्ठ साहित्यिक माणिक गोडसे, कवी रज्जाक शेख ,प्रा शिवाजी हुसे समुहाच्या मार्गदर्शिका वंदना धाकडे रत्नागिरी मनवरे उपस्थित होत्या.


या कार्यक्रमात कल्पना निंबोकार अंबुलकर यांच्या कल्पनेचा चांदवा व स्त्रि मनाच्या गाभाऱ्यातून या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले हया पुस्तकावर कवी लेखक हबीब भंडारे , व ज्येष्ठ साहित्यिक शिवा प्रधान अमरावती भाष्य केले
या कार्यक्रमा साहित्यक्षेत्राृत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्याचा गुणगौरव करण्यात आला व त्याना समूहातर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आले दीपप्रज्वलन स्वागतगीत होवून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
राज्यभरातून आलेल्या 70 कविचे बहारदार कविसंमेलन घेण्यात येणार आहे व त्या कविसंमेलन अध्यक्षस्थानी चित्रपट गीतकार गुलाबराजा फुलमाळी होते व प्रमुख अतिथी म्हणून रज्जाक शेख, शंकर कदम उल्हास देशपांडे दिपक नागरे गोकुळ देवरे सर गजानन दराडे सर उपस्थित होते या कार्यक्रमाला कलशपुजन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरवात झाली.सर्व पाहुण्यांनी ज्ञानेश्वरी असलेल्या फुलांच्या सजविलेल्या परातीला शिरावर उचलून पुजनाच्या स्थळी आणण्यात आले
दीपप्रज्वलन स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या कवि लेखकाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कविसंमेलनाला सुरवात झाली प्रत्येक कविला सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ असे आयोजक प्रा कल्पना निंबोकार अंबुलकर यांनी केले आहे या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशांत अंबुलकर क्षितीज अंबुलकर पर्णवी अंबुलकर प्रमोद सुर्यवंशी,ज्ञानेश्वर काळे, विलास नवसागरे ,सुरेखा बेंद्रे, दिनेश चव्हाण , सरिता कलढोणे अनुराग पापडकर नितीन गायके यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 4 =