“साहस” अपना नाम “रोशन ” करेगा….

“साहस” अपना नाम “रोशन ” करेगा….

नसिमा दिदि, महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या भारतवर्षाला सर्वाथाने माहीत असलेलं नाव..८५हून जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले पुरस्कार आणि चाकाच्या खुर्चीवर बसून सातत्याने गेली पन्नास वर्षे अपंगाच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी अहोरात्र काम करणाऱ्या दिदिनी अपंगाच्या पंखात आत्मविश्वास निर्माण करुन गगनाला गवसणी घालण्याच सामर्थ्य प्राप्त करुन दिलं.”स्वप्ननगरी फुलवली..ती बहरली..आणि तिला नजरही लागली…पण दिदि थांबणारी नाही.. वयाच्या ७१व्या वर्षीही दिदिनी आपल्या जुन्या सहकाऱ्याबाबत कोणतीही कटूता मनात न ठेवता..वादात न पडता “साहसची”नवी वाट आपल्या काही नव्या सहकाऱ्याना बरोबर घेऊन चालायला सुरुवात केली…आणि माझ्या सुदैवाने त्यांच्या या प्रवासात त्यांच्या बरोबर माझ्या क्षमतेनुसार चार पावलं चालायची संधी मला नसिमादिदिनी दिली.
साहसचा मन हेलावून टाकणारा उदघाटन सोहळा दिनांक १६ जानेवारी रोजी करवीर नगरीत केशवराव भोसले सभागृहात मोठ्या दिमाखात अनेक महनीय व्यक्तींच्या साक्षीने संपन्न झाला. आशिर्वाद देण्यासाठी श्री श्री मंत शाहू महाराज जातीने उपस्थित होते.ज्यामध्ये मला सहकुटुंब सहभागी होण्याचं भाग्य लाभलं.
या कार्यक्रमात मन हेलावून टाकणारा आणि आपल्याला जीवनविषयक सकारात्मक विचार करायला लावणारा आणि ह्यदयात कायमचा कोरला गेलेला “डॉ. रोशन शेख “या मुलीचा सत्कार.
डॉ. रोशन शेख हिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला.लहानपणापासून आपण भविष्यात डॉ. होवून गोरगरिबांची सेवा करण्याचं तीच स्वप्न.. आणि म्हणूनच हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी तीने अतिशय प्रतिकुल परिस्थिती मुंबई उपनगरात राहून अभ्यास केला.दहावीला तिला ९२ टक्के गुण मिळाले.तीने शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. मुंबईच्या रेल्वेच्या जीवघेण्या प्रवासाची शोकांतिका आपण नेहमीच ऐकतो.उपनगरी रेल्वेतून प्रवास करत असताना रोशनचा दूर्देवी अपघात झाला.त्यावेळी तीची अकरावीची परिक्षा सुरु होती…काळाने आणि नियतीने तिच्यावर असा घाला घातला कि त्या भीषण अपघातात गाडी पायावरुन गेल्याने दोन्ही पाय कायमचे निकामी झाले.काही महिने हाँस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.तीचा उजवा पाय कमरेखाली कापावा लागला व डावा पाय गुडघ्याखाली निकामा झाला.आपल्या सत्काराला उत्तर देताना रोशन जेव्हा मनोगत व्यक्त करत होती तेव्हा रोशनची दर्दभरी कहाणी ऐकून उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते..ज्याला मीपण अपवाद नव्हतो.
डॉ. रोशनचा पुढचा प्रवास थक्क करणारा आणि समाजातील डोळसांना गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे.तीन जिद्द सोडली नाही.. मी डाँ होणारचं या ध्येयाने आपले दोन्ही पाय गमावलेली मुलगी पछाडली होती.सतत ती आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत होती..तीचे पालक तिला बळ देत होते.बारावीची परिक्षा तिने खुर्चीत बसूनचं दिली.आश्चर्याची गोष्ट म्हणजे बारावीतही ती चांगल्या गुणाने पास झाली आणि तीने पुढचं शिवधनुष्य उचललं ते म्हणजे वैद्यकीय प्रवेश परिक्षेचं..त्याही अवस्थेत तिने ती परिक्षा दिली आणि त्या प्रवेश परिक्षेत ती दिव्यांगामध्ये राज्यात तीसरी आली..तीने मुंबईतील सेठ गोविंदराम वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला…पण आपल्या “व्यवस्थेमुळे” याठिकाणी सुध्दा दोन पाय कायमचे गमावलेल्या रोशनला प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला.येथे तिला प्रवेश नाकारण्यात आला.पुन्हा दुर्दैव आडवं आलं.दिव्यांगाना प्रवेशासाठी अशी अट होती की,सत्तर टक्के अपंगत्व असेल तर प्रवेश मिळेल…पण रोशनचं अपंगत्व ८९%होत…रोशन था़बली नाही.. तिने आपला संघर्ष सुरुच ठेवला…तीने यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले…तीने प्रश्न उपस्थित केला…मी माझे फक्त दोन पायच गमावलेत…बाकी मी सर्वाथाने सक्षम आहे…मा.न्यायालयाला पाझर फुटला..मा.सह्यदयी न्यायमूर्तीनी रोशनला विनाविलंब प्रवेश देण्याचे आदेश दिले आणि रोशनला M.B.B.S साठी प्रवेश मिळाला…आणि रोशन प्रथम श्रेणीत M.B.B.S परिक्षा पास झाली आणि डाँक्टर झाली.गगनाला गवसणी घालणारी रोशन आता एवढ्यावरच थांबली नाही तिने M D.Path.ला प्रवेश घेतला…पुन्हा जिद्दिने अभ्यास सुरु केला…आणि याही परिक्षेत दिव्या़गामध्ये ८९% गुण घेऊन दिव्या़गात इतिहास घडवणारी भारतातील पहिली महिला ठरली.या तिच्या अभूतपूर्व कर्तृत्वाला अनेक संस्थानी पुरस्कार देवून तिला गौरविले आहे..परवा कार्यक्रमात तिच्याशी संवाद साधताना तिला मी सहज विचारलं” डॉ. रोशन आता तुझ पुढच ध्येय काय?. या प्रश्नांवर तीने तेवढ्याच आत्मविश्वासाने हसत हसत उत्तर दिल ,”मी इथच थांबणार नाही.. मला भारतीय प्रशासकीय सेवेची परिक्षा द्यायची आहे” खरचं डाँ रोशन सलाम तुला,तुझ्या जिद्दिला आणि हिमालयासारखे तुझ्या पाठिशी रहाणाऱ्या तुझ्या आदर्श पालकांना…


या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इचलकरंजीचे मा.खासदार मानेसाहेब यांनी अतिशय समर्पक शब्दात मांडणी केली.ते म्हणाले की”डाँ रोशनताई आणि नसिमादिदिकडे बघितल की आमचीच आम्हाला लाज वाटते,रोशनताई, नसिमादिदि तुम्ही अपंग नाही तर खरे अपंग आम्ही आहोत.
वयाच्या ८०व्या वर्षी पण त्याच उर्जेने प्रभावी विचार मांडणारे साताऱ्याचे खासदार मा.श्रीनिवास पाटील यांनी नसिमा दिदि आणि रोशन यांच्या या अतुलनीय कर्तृत्वाचा धागा पकडून समाजाने आता डोसळपणे अशा घटनांकडे पहाण्याची गरज विशद केली..खरं तर पाटिल साहेबांबद्दल मला विलक्षण आकर्षण.. त्यांचा सगळाच प्रशासकीय आणि राजकीय प्रवास थक्क करणारा आहे…प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त, राज्यपाल आणि आता खासदार… अशा उत़ुग महानुभवांचे स्वागत करण्याचे भाग्य मला या कार्यक्रमात आदरणीय दिदिनी दीले …दिदि थँक्स.


या कार्यक्रमात आणखीन एक मनाला मनस्वी आनंद देणारी घटना घडली.कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.हसनजी मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त करताना एक घोषणा केली…कि राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या राज्य अपंग महामंडळाच्या अध्यक्षपदी मा.डॉ. नसिमादिदिना संधी देण्यात येईल.खरचं ही घोषणा जर प्रत्यक्षात उतरली तर साहसचा पुढचा सगळा प्रवास दिव्यांगांच्या स्वप्नपूर्तीकडे जाईल यात शंकाच नाही..
एकंदरीत साहसचा हा उदघाटन सोहळा माझ्यासाठी खूपच आनंददायी होता…वन्स अगेन थँक्स टू नसिमादिदि आणि साहस परिवार…
….अँड.नकुल पार्सेकर….
..विश्वस्त-साहस,कोल्हापूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा