You are currently viewing उबाठा सेना राष्ट्रवादीत विलीन करणार ; आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

उबाठा सेना राष्ट्रवादीत विलीन करणार ; आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

*महाविकास आघाडीतील नव्या प्रस्तावाची आमदार नितेश राणे यांनी केली पोल खोल

कणकवली

भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी आज पुन्हा उबाठा शिवसेनेबद्दल नवा गौप्यस्फोट केला केला आहे.महाविकास आघाडीत एक प्रस्ताव आहे तो म्हणजे उबाठा सेना राष्ट्रवादी पक्षात विलीन करावी आणि लोकसभा आणि विधासभेच्या निवडणुका ठाकरेंचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढवावेत असा तो प्रस्ताव आहे. खासदार संजय राऊत हेच दोन वेळा हा प्रस्ताव घेऊन सिल्वर ओक वर चर्चा केली असल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचे आमदार नितेश राणे यांनी इलेक्ट्रिक मीडियाच्या पत्रकार परिषदेत सांगितले. उबाठा पक्ष चिन्ह मशाल नवीन आहे आणि संघटना तळागाळात नेण्यासाठी वेळ कमी आहे. त्यामुळे पक्ष राष्ट्रवादीत विलीन करून एकत्र म्हणून मोठ्या जागा काँग्रेस कडे मागायच्या असा प्रस्ताव असल्याचा भाजपा नेते नितेश राणे यांनी गौप्यस्फोट केला.
आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा होणार नाहीत अशी माहिती दिली होती. ती माहिती तंतोतंत खरी ठरली आणि दुसऱ्या दिवसापासूनच वज्रमुठ सभा बंद झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना ही राष्ट्रवादीत विलीन करून मोठ्या जागा उभाठा आणि राष्ट्रवादी साठी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे सांगून राजकारणात हालचाल मजविली आहे. भाजपा ला रोखण्यासाठी त्याग करायला हवा म्हणणारे स्वतःच्या लामकाचा पक्ष राष्ट्रवादीत विलीन करून त्याग करण्याची भाषा बोलत आहेत.
तो त्यागाचा संदेश उद्धव ठाकरे यांच्यासाठी आहे.उबाठा च्या ७/१२ वर घड्याळ चिन्ह येणार आहे. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
आजचा सामनात अग्रलेखाचे शीर्षक चुकले आहे. पंतप्रधान मोदी यांनी संसद भवन उभे केले आणि त्याचे लोकार्पण सोहळा जो केला त्याने भारताच्या प्रत्येक पिढीला अभिमान वाटेल,असा हिदू राष्ट्राला साजेसा असा सोहळा होता. त्यामुळे पोटशूळ होवून सामना मध्ये अग्रलेख लिहिला आहे.असे सांगताना आमदार नितेश राणे म्हणाले, मातोश्री २ चा महाल ,उभा केला त्यासाठी कुठून पैसा आला. कोरोनाचा पैसा कसा तिकडे घातला.कर्जत च्या फार्म हाऊस मधील जमिनीत पुरलेला पैसा तर नाही ना. याची उत्तरे आणि त्याचा अग्रलेख लिहिला पाहिजे होता.

बॉक्स
*मातोश्री २ चे इंटिरियर २५० कोटीचे*
मातोश्री २ चे इंटिरियर २५० कोटी रुपयांचे आहे. हा पैसा आणला कुठून ? ठाकरे यांचा अधिकृत कोणताही व्यवसाय नाही.ही माहिती दुपारचा सामनाचे माजी संपादक संजय यांनी काढलेले आहे. त्यामुळे हे आरोप किती खरे आहेत हे अग्रलेख लिहून कळवा.तर तुझ्या मालकांच्या या नवीन महाल मध्ये शिवसैनिकांना प्रवेश आहे काय ? त्यात संजय राउत ना सुद्धा प्रवेश नाही.कोणत्याच सेना नेत्यांना आत मध्ये प्रवेश नाही.असेल तर जावून फोटो काढा आणि पाठवा. असे आव्हान दिले
बॉक्स
*माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना कधीच निमंत्रण दिले नाही*
तुमचा मालक मुख्यमंत्री होता. तेव्हा त्यांनी विरोधी पक्षाला निमंत्रणे दिली नाही. याची यादी देतो.मेट्रोचे जाळे देवेंद्र फडणवीस यांनी विणले ते विरोधी पक्ष नेते होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना निमंत्रण दिले नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला सर्व परवानजा फडणवीस साहेबांनी आणल्या मात्र विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांना निमंत्रण दिले नाही. असे अनेक उदाहरणे देता येतील जी विरोधी पक्षाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रितच केलेले नाही.असा आरोप केला.
राहुल गांधी यांच्यावर छत्रपती शिवरायांच्या बरोबरीचे नागे बनविले तेव्हा हे अंबादास दानवे कुठे होते ?. तेव्हा काँग्रेसला जात का विचारला नाही असा सवाल एका प्रश्नावर उत्तर देताना केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 17 =