You are currently viewing “अन्नपूर्णा टेक सोर्स ॲण्ड गो सोर्स” च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्या नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन…

“अन्नपूर्णा टेक सोर्स ॲण्ड गो सोर्स” च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्या नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन…

“अन्नपूर्णा टेक सोर्स ॲण्ड गो सोर्स” च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्या नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन…

दहावी पास-नापास विद्यार्थ्यांना आता “स्किल एज्युकेशनचे देणार शिक्षण”…

सावंतवाडी

दहावी पास किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सावंतवाडीतील “अन्नपूर्णा टेक सोर्स टेक सोर्स ॲण्ड गो सोर्स” च्या माध्यमातून शेती, सुतारकाम लोहारकाम अशा प्रकारचे स्किल एज्युकेशन देण्याचा आमचा मानस आहे. त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत अधिकारी सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी दिली.

टेक सोर्स च्या या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन उद्या राज्याचे मत्स व बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सीईओ ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर आणि भिकाजी कानसे आदी उपस्थित होते.

त्यावेळी सौ. कोरगावकर म्हणाल्या, सावंतवाडीत गेल्या मार्च महिन्यात सुरू करण्यात आलेल्या टेक सोर्स ॲण्ड गो सोर्स या कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत ४५ जणांना रोजगार देण्यात आला. आता हा पसारा आम्ही वाढवत आहोत. येथे स्थानिक युवकांची गरज लक्षात घेता त्यांना रोजगार देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या कंपनीचा दुसरा टप्पा आम्ही सुरू करीत आहोत. यात ६५ जणांना रोजगार दिला जाणार आहे. यासाठी फक्त पदवीधर अशी अट ठेवण्यात आली आहे तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान व संवाद साधण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे. या मुलाखत प्रक्रिया लवकरच घेण्यात येणार आहे. स्थानिक तरुण-तरुणींना यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा स्थानिकांना होणार. भविष्यात स्किल एज्युकेशन देण्याचा आमचा माणूस आहे. त्या दृष्टीने दहावी पास-नापास विद्यार्थ्यांना शेती सुतार काम लोहार काम अशा प्रकारची अनेक प्रशिक्षणे देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण फक्त एक महिन्याचे असणार आहे. त्यानंतर संबंधितांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे किंवा ते स्वतः रोजगार निर्माण करू शकतो अशी त्यांना बळकट करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे.

यावेळी सौ. ऐश्वर्या कोरगावकर म्हणाल्या, त्या ठिकाणी कंपनी स्थापन करण्यात आल्यानंतर स्थानिक युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. परंतु या ठिकाणी इंग्रजी भाषा बोलण्याचा किंवा संवाद साधण्याचे कौशल्य या ठिकाणी तितकेसे नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र ती परिस्थिती बदलण्यासाठी आमच्याकडून एक वर्षाचा मोफत कोर्स देण्यात येणार आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी राज्याची कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोरगावकर परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा