You are currently viewing कोळपे जमात उर्दू शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा

कोळपे जमात उर्दू शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा

कोळपे जमात उर्दू शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा

वैभववाडी

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू कोळपे जमात या शाळेत शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात. या मागणीचे निवेदन ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन कमिटी यांच्यावतीने देण्यात आले आहे. वैभववाडी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले आहे. कोळपे जमातवाडी या प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी साठी एकूण 106 विद्यार्थी आहेत. पाच शिक्षक असलेल्या शाळेत सद्यस्थितीत दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेत तीन शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामध्ये दोन पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी या शाळेत त्वरित तीन शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्यात, संबंधित विभागाने याची दखल न घेतल्यात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, पालक पंचायत समिती कार्यालयात येऊन विद्यार्थ्यांची शाळा भरवणार असा इशारा निवेदनातून ग्रामस्थांनी दिला आहे.

निवेदन देतेवेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मजीद कादिर नंदकर, हमीद कादीर लांजेकर, बाबालाल अहमद लांजेकर, शहाबुद्दीन युसुफ लांजेकर, मुस्ताक महम्मद नाचरे, समीर गुलाब चोचे, गणि कादीर लांजेकर, नासिर महम्मद नाचरे, नासिर कमरुद्दीन नंदकर, जलाल हबीब लांजेकर, दिलावर दाऊद सारंग आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा