You are currently viewing त्या’ कंत्राटी वीज कामगाराच्या वारसांना मिळणार चार लाख रुपये 

त्या’ कंत्राटी वीज कामगाराच्या वारसांना मिळणार चार लाख रुपये 

त्या’ कंत्राटी वीज कामगाराच्या वारसांना मिळणार चार लाख रुपये

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश – जिल्हाध्यक्ष आनंद लाड

कुडाळ

एखादा कंत्राटी वीज कामगार वीज वितरणची सेवा बजावताना अपघाती मृत झाल्यास त्याच्या वारसाला ४ लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी वीज कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी प्रसिद्धी दिली.८ जानेवारी रोजी सहयाद्री अतिथीगृह (मुंबई) येथे भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ व अन्य विविध संघटना प्रमुख यांची उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आयोजित केली होती. यात वीज कंत्राटी कामगार हिताचे काही निर्णय फडणवीस यांनी घेतले. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी उर्जा • विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांना दिल्या होत्या.

*यापूर्वी तरतूद नव्हती!*

वीज कंत्राटी कामगारांचा अपघात झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत देण्याची तरतूद नव्हती. ही बाब ८ जानेवारी रोजी संघटनेने उर्जामंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार ज्ञाता तिन्ही कंपन्यांपैकी एखादा वीज कंत्राटी कामगार अपघातात मृत झाल्यास त्याच्या वारसाला ४ लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे याबाबत महापारेषण कंपनीने ११ जानेवारी रोजी परिपत्रक काढल्याचे वीज कंत्राटी कामगार संघाचे राज्य अध्यक्ष नीलेश खरात यांनी सांगितले. वीज कंत्राटी कामगारांना महापारेषण व महावितरण भरतीत आरक्षण व वयात सवलत मिळावी, कोर्ट केसीसमध्ये संरक्षण मिळावे तसेच आयटीआय नसलेले मात्र कुशल व अनुभवी अशा कामावरून कमी केलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागण्या संघाने केल्या आहेत.

*ते काळ्या यादीत!*

या प्रलंबित निर्णयासाठी व राज्यातील कंत्राटी कामगारांना भेडसावत असलेल्या अनेक समस्या तातडीने सोडवून कामगारांना त्वरित न्याय मिळाला पाहिजे, यासाठी राज्य वीज कंत्राटी कामगार संघाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावून लवकर बैठक घेण्याची सूचना प्रधान सचिव आभा शुक्ला व प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांना त्यांनी दिल्या. तसेच परिपत्रकानुसार काम करीत नसलेल्या दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना फडणवीस यांनी बैठकीत दिल्या असून त्यांनी यासाठी कंत्राटी कामगार संघासोबत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी संघाचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केल्याचे लाड यांनी पत्रकात म्हटले आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 13 =