*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभिवादन!*
*’ ज्ञानगंगा ‘*
अविद्येच्या तमा निवारण्या
ज्योत शिक्षणाची पेटविली
स्त्री वर्गाच्या उद्धारणास्तव
आधुनिक सावित्री लढली ||
समाजकारणे पेटलेली
तळपती क्रांतीज्योती असे
स्त्रीशिक्षण मार्ग प्रकाशिला
कर्तृत्व तियेचे थोर असे ||
संकटांना पार करूनिया
जिद्दीने लढणे सोपे नव्हे
अंतरीची तळमळ मोठी
पंखात अपार बळ हवे ||
वंदन असे या माऊलीस
समाजास्तव नित्य कष्टिली
अंतरीची जिद्द चेतवून
स्त्रीला सन्मानाची वाट दिली ||
*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*