You are currently viewing ऐन दिवाळीत LOC वरून धक्कादायक माहिती…

ऐन दिवाळीत LOC वरून धक्कादायक माहिती…

भारतीय जवानांचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, पाकच्या 8 सैनिकांचा खात्मा, बंकरसह लॉन्च पॅडही उध्वस्त..

श्रीनगर :

देशभरात दिवाळीनिमित्त आनंद साजरा केला जात असताना LOC वरुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. LOC वरील बारामुल्ला येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात BSF अधिकारी सबइन्स्पेक्टर राकेश डोभाल शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबरोबरच आणखी एका जवानाला यात वीरमरण आलं.

 

तसेच कमलकोट आणि बालकूट येथील भागात 3 स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय केरन सेक्टरमध्येही पाकिस्तान मोर्टारने बॉम्ब हल्ला करीत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आतापर्यंत पाकिस्तानकडून तीन भागांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. भाडीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमधील इझमार्ग भागात दुपारी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यानंतर पुढील काही मिनिटात कुपवाडा जिल्हात गोळीबार झाला.  पाकिस्तानी आर्मीने युरी सेक्टरमधील बारामुल्लाच्या दिशेने गोळीबार केला होता.

 

यावेळी बीएसएफच्या जवानांनीही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन जवानावा वीरमरण आलं. याशिवाय तीन स्थानिकांचाही मृत्यू झाला. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, पाकचे सुमारे 10-12 सैनिक जखमी झाले आहेत आणि पाक लष्कराचे मोठ्या प्रमाणात बंकर व लाँच पॅड नष्ट करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =