पोलीस पाटील संघटनेमार्फतदेवगड बीच स्वछता !
देवगड
विजयदुर्ग आणि देवगड पोलीस पाटील संघटना एकत्र येऊन २७ डिसेंबर २०२४ रोजी पोलीस पाटील यांनी एकत्रित सभा घेतली. या सभे मध्ये सर्वांनी पोलीस पाटील यांच्या विविध मागण्या आणि त्यांच्या हितासाठी न्यू गावकामगार संघटनेत सामील होऊन एकत्रित लढा देण्याचे आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी रक्तदान, शिबीर, स्वच्छता मोहीम या सारखे विविध उपक्रम राबविण्याचे ठरवले.२०२४ व नववर्षाचे स्वागत प्रसंगी देवगड बीचवर जल्लोष हा कार्यक्रम साजरा केला. त्या अनुषंगाने न्यू गावकामगार पोलीस पाटील संघटना देवगड, चे नवनिर्वाचित अध्यक्ष भिकाजी गिरकर कुणकेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन वर्षाचे स्वागत सम्पूर्ण देवगड बीच स्वच्छता मोहीम राबवून करण्यात आले. स्वच्छता करण्यासाठी लागणारे साहित्य नगरपंचायत देवगड यांच्याकडून पुरविण्यात आले