You are currently viewing वैभववाडी येथे जिल्हा बँकेच्या वतीने ग्राहकांना वाहन खरेदीची सुविधा

वैभववाडी येथे जिल्हा बँकेच्या वतीने ग्राहकांना वाहन खरेदीची सुविधा

वैभववाडी येथे जिल्हा बँकेच्या वतीने ग्राहकांना वाहन खरेदीची सुविधा

कर्ज स्वरूपात ग्राहकांकडून 24 दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी

जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते चावी प्रदान कार्यक्रम संपन्न

वैभववाडी

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., शाखा वैभववाडी यांचेमार्फत 24 गाड्यांना कर्ज वितरण करण्यात आले आहे. ग्राहकांना दीपावली व नवीन वर्षानिमित्त दुचाकी व चारचाकी अशी 24 वाहने कर्ज स्वरूपात देण्यात आली आहे. जिल्हा बँक संचालक श्री दिलीप रावराणे यांच्या शुभहस्ते चावी प्रदान कार्यक्रम पार पडला.

यावेळी जेष्ठ व्यापारी श्री. रत्नाकर कदम, वाहन धारक, बँकेचे तालुका विकास अधिकारी श्री प्रल्हाद कुडतरकर, वैभववाडी शाखा सहा. व्यवस्थापक श्री. सुरेश रावराणे, भुईबावडा शाखा व्यवस्थापक श्री. धनंजय पडवळ, तिथवली शाखा व्यवस्थापक श्री. प्रसाद रावराणे, आचिर्णे शाखा व्यवस्थापक श्री. प्रसाद पवार, नधवडे शाखा व्यवस्थापक श्री. आदम साटविलकर, उंबर्डे शाखा व्यवस्थापक श्री. श्रीपाद सावंत, करूळ शाखा व्यवस्थापक श्री. राजेश जाधव व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा