*नवीन वर्ष २०२५*
वर्ष निसटले चोरपाऊली
उरले होवुन तारीख केवळ
संकल्पाचे सारे धुमारे
पुन्हा झटकतील सारे मरगळ
चुकले त्याला अनुभव म्हणोनी
हुकले त्याला हसुन टाळु
राग लोभ पण मांडु नव्याने
जोवर शिल्लक मुठीत वाळु
*कवी गुरु ठाकुर*
*संग्रह # अजित नाडकर्णी.संवाद* मिडीया✒️✒️✒️✒️✒️✒️*✒️✒️*