You are currently viewing गणेश भक्तीगीत

गणेश भक्तीगीत

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम गीत रचना*

*”गणेश भक्तीगीत*

माझा बाप्पा *”गणपती**
रूपे ,नावे अनेक कीती,
भक्त सारे पूजेस जमती
करीती मनोभावे आरती. १

विद्या,बुद्धीची तू देवता
सकल कार्याचा तु करवीता
प्रथम तुजला मी नमीता
पावसी तुच हे कृपावंता. २

जास्वंदी,दूर्वा वाहूनी
पंचारती ओवाळूनी
२१ मोदक देऊनी,
तूझे गुणगान गाऊनी. ३

रीद्धीसीद्धी आजुबाजुला
सुंदर मुकुट शीरी सजला
सुवासीक फुलांनी नटला
प्रसन्नता येई मग मनाला. ४

कर देवा सुजला सृष्टीला
मीळो सुख, संपत्ती,आरोग्य प्रत्येकाला
पळवूनी या दूष्ट करोनाला
छान नीरोगी जीवन दे आम्हाला…५

सौ योगिनी वसंत पैठणकर नाशिक. अंगारकी चतुर्थी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =