You are currently viewing सेवानिवृत्त शिक्षकांसाठी ३ रोजी ओरोसला मार्गदर्शन

सेवानिवृत्त शिक्षकांसाठी ३ रोजी ओरोसला मार्गदर्शन

सेवानिवृत्त शिक्षकांसाठी ३ रोजी ओरोसला मार्गदर्शन

सिंधुुर्गनगरी

जिल्हा परिषदेकडून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना शासन व प्रशासनाकडून देय असणाऱ्या लाभाच्या रकमा निवृत्तीनंतर दीर्घकाळ उलटला, तरी त्या वेळीच मिळत नाहीत. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय लाभापासून वंचित राहतात, जि. प.कडून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या उपदान, अंशराशीकरण, भविष्य निर्वाह निधी, गटविमा, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते व अन्य कार्यरत कालावधीतील अनेक प्रकारच्या रकमा अद्यापही मिळालेल्या नाहीत. अशा सेवानिवृत्त शिक्षकांसाठी ३ जानेवारी रोजी सकाळी १० वा. जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी, सिंधुदुर्गनगरी येथे मार्गदर्शन आयोजित केले आहे.

सभेसाठी येताना प्रत्येकाने आपल्या सेवानिवृत्तीच्या चार पानी आदेशाची सुस्पष्ट छायांकित प्रत, निवृत्ती वेतन जुने व नवे पासबूक तसेच आपल्या सेवानिवृत्ती व प्रलंबित आर्थिक लाभासंदर्भात जे-जे कागदपत्रं उपलब्ध असतील, ते घेऊन उपस्थित राहायचे आहे. आपल्या कागदपत्रांची आपण योग्य काळजी घ्यायची आहे. जिल्हा शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, विजय मयेकर व अन्य शिक्षक प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन रमेश आर्डेकर, बाबू परब, सोनू नाईक यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा