You are currently viewing कण

कण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा डॉ जी.आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कण*

 

दुःख दिसलं सुपभर

सुख मिळालं कणभर

डोंगर होता भरल्या काट्यानी

करवंद बसली जाळीवर

 

आवळा बसला झाडावर

भोपळा दिसला वेलीवर

देवा तुझं ईपरीत काहीं

आंबा लोम्बतो वाऱ्यावर

 

सुखातला दुःखाचा बिब्बा

नदीकाठी काळी घागर

अंधारातील खेळ जगाचा

जीवनाचा होतो मग जागर

 

येळकोट येळकोट घेताना

म्हाळसाचा होतो विसर

संबळ डंबळ वाजवताना

पिवळा भडक होई नांगर

 

पिकली शेती रांधली चूल

काळ्या मातीचा होतो चाकर

चटके हाताला बसताना

पोटात जाई कोर भाकर

 

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

नसलापुर

प्रतिक्रिया व्यक्त करा