You are currently viewing कुडाळ शहरात रहदारीच्या रस्त्यावर सेवानिवृत्त शिक्षकास गंडा

कुडाळ शहरात रहदारीच्या रस्त्यावर सेवानिवृत्त शिक्षकास गंडा

क्राईम ब्रांचचे पोलिस असल्याचे भासवत सोन्याचा ऐवज लंपास

कुडाळ

कुडाळ शहरातील अभिमन्यू हॉटेल येथील रहदारीच्या रस्त्यावर एका सेवानिवृत्त शिक्षकांना आपण क्राइम ब्रँचचे पोलिस असल्याचे भासवत त्यांच्याकडील सोन्याची चैन व अंगठी असा एक लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल दोन दुचाकी धारक अज्ञान चोरट्यांनी लंपास केला . ही घटना रविवारी दुपारी १.२० च्या सुमारास हाँटेल अभिमन्यू या रहदारीच्या रस्त्यावर भर दुपारी घडली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शशिकांत देसाई हे भाजी घेऊन स्वतःच्या दुचाकीने आपल्या कुडाळ एमआयडीसी येथील घरी जात होते. यावेळी कुडाळ शहरातील अभिमन्यू हाँटेल येथे त्यांच्या मागून एक हेल्मेट घातलेला दुचाकीस्वार आला या दुचाकीच्या मागे अन्य एक व्यक्ती होती व त्याने तुम्ही कुठे जात आहात आम्ही क्राईम ब्रँचचे पोलिस असून तुम्ही सोन्याचे दागिने घालून का फिरता? असे विचारत श्री देसाई यांच्याकडील रुमाल घेतला व त्या रूमलात त्यांच्या खिशातील पाकीट सोन्याची चैन व अंगठी बांधून तो रुमाल गाडीच्या डिकी मध्ये ठेवला व ते तिथून निघून गेले. श्री देसाई यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ डिकी उघडून रुमाल तपासला असता त्या रुमालात सोन्याची चैन व अंगठी आढळून आली नाही. मात्र तोपर्यंत दोन्ही चोरट्यांनी घटनास्थळावरून पळून जाण्यात यश मिळवले होते. यातील सोन्याची चैन १८ ग्रँमची तर अंगठी सात ग्रॅम असा सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या चोरट्यांनी चोरून नेला. क्राईम ब्रँचच्या नावाचा वापर करत तोतया पोलीस बनून आलेल्या या चोरट्यांच्या सेम एकाच स्टाईलने चोरी करण्याच्या प्रकारात मोठ्या वाढ झाली आहे. मात्र यातील एकाही चोरीचा पर्दापाश करण्यात पोलिस प्रशासनाला यश आलेले नाही. शहरातील हाॅटेल अभिमन्यूचा परिसर रहदारीचा असूनही या चोरट्यांनी भर दुपारी चोरीचे धाडस केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 20 =